दूध संस्था कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:35+5:302021-08-20T04:28:35+5:30
गारगोटी : गोकुळ संघ संलग्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना कोल्हापूर यांच्या वतीने कोरोना कवच निधीचे गारगोटी ...

दूध संस्था कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप
गारगोटी :
गोकुळ संघ संलग्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना कोल्हापूर यांच्या वतीने कोरोना कवच निधीचे गारगोटी (ता.भुदरगड) येथे धनादेश वाटप करण्यात आले. गोकुळ संलग्न दूध संस्थेतील कोरोनाबाधित कर्मचारी, कोरोनाने मृत किंवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींना धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील होते. यावेळी श्रीमती शीतल संभाजी कदम (राणेवाडी) , अर्जुन दाभोळे (वाघापूर), हणमंत आगम (पाचवडे), महादेव कडव (भाटीवडे), सुनील हळदकर (कूर), नागेश पाटील (कोनवडे), श्रीकांत कुंभार (मडिलगे) यांना अध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, सुनील विभूते, के. वाय. पाटील, संभाजी सुतार, डी. एम. वास्कर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. डी. पाटील यांनी केले. आभार अर्जुन दाभोळे यांनी मानले.
फोटो ओळ-गोकुळ संलग्न कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने कोरोना विमा कवच वाटप करताना के. डी. पाटील, धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, सुनील विभूते, के. वाय. पाटील व इतर.