‘इफको’तर्फे शिरोली दुमालात ब्लॅंकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:28+5:302021-01-25T04:23:28+5:30
काेल्हापूर : इफकोच्यावतीने शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ‘इफको’चे आमसभा सदस्य व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ ...

‘इफको’तर्फे शिरोली दुमालात ब्लॅंकेट वाटप
काेल्हापूर : इफकोच्यावतीने शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ‘इफको’चे आमसभा सदस्य व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले, यावेळी शामराव पाटील-वाळोलीकर, जिल्हा क्षेत्र अधिकारी विजय बुनगे आदी उपस्थित होते,
विश्वास पाटील म्हणाले, जगातील ३०० कंपन्यांमध्ये इफकोला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. खते उत्पादन व विक्रीतील ही मोठी व सर्वांत जास्त २० टक्के लाभांश देणारी पहिला संस्था आहे. यावेळी उर्मिला विश्वास पाटील, रयत संघाचे व्यवस्थापक तानाजी निगडे, वीरशैव बँकेचे माजी चेअरमन अनिल सोलापुरे, नंदकुमार पाटील, माधव पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, एस. के. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील आदी उपस्थित होते. युवराज भोगम यांनी आभार मानले.
फोटो ओळी : ‘इफको’तर्फे शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वास पाटील, शामराव पाटील, विजय बुनगे, तानाजी निगडे, अनिल सोलापुरे, नंदकुमार पाटील, माधव पाटील, रेखा कांबळे, सरदार पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-२३०१२०२१-कोल-इफको)