शिरोली दुमाला येथे शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST2021-04-15T04:23:07+5:302021-04-15T04:23:07+5:30

शासनाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा दिल्या जातात. त्यापैकीच एक सोय शेतकऱ्यांना औषधे व औषध फवारणी पंप ...

Distribution of agricultural pumps to farmers at Shiroli Dumala | शिरोली दुमाला येथे शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वाटप

शिरोली दुमाला येथे शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वाटप

शासनाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमामधून शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा दिल्या जातात. त्यापैकीच एक सोय शेतकऱ्यांना औषधे व औषध फवारणी पंप सबसिडीच्या माध्यमातून ३० औषध पंपांचे वाटप भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस दादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजना व मिळणारे शेतकरी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. यावेळी शिव फौंडेशनचे अध्यक्ष वारके सचिन पाटील, श्रीकांत कुंभार, शिवाजी कोईगडे, महादेव पाटील, संदीप माळी, सुनील देसाई यांच्यासह शेतकरीवर्ग, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत गुंडू खोंद्रे यांनी केले. विशाल देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of agricultural pumps to farmers at Shiroli Dumala