आठ दिवसांत १ हजार ३१४ रेमडेसिविरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:18+5:302021-04-30T04:30:18+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यातील विविध किमान ४० खासगी रुग्णालयांना १ हजार ...

आठ दिवसांत १ हजार ३१४ रेमडेसिविरचे वितरण
कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत गेल्या नऊ दिवसांत जिल्ह्यातील विविध किमान ४० खासगी रुग्णालयांना १ हजार ३१४ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. किमान ४ पासून ते २० पर्यंत रुग्णालयाच्या मागणीनुसार ही इंजेक्शन्स देण्यात आली आहेत.
रेमडेसिविरचा तुटवडा असल्याने या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत होता तो रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून रुग्णालयांना इंजेक्शनचे योग्यरितीने पुरवठा केला जात आहे. नातेवाइकांची धावपळ थांबविण्यासाठी रुग्णालयांकडूनच नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी केली जाते. दिवसाला सरासरी दीड हजार इंजेक्शनची मागणी आहे; मात्र आलेल्या इंजेक्शन सर्व रुग्णालयांमध्ये समप्रमाणात वाटप केले जात आहे.
---
रेमडेसिविरचे असे झाले वितरण
तारीख : संख्या
२० एप्रिल : २७९
२२ एप्रिल : ३१०
२६ एप्रिल : ४०८
२७ एप्रिल : १२५
२८ एप्रिल : १९२
--