खाऊसाठी साठवलेल्या पैशातून गरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:31+5:302021-02-20T05:10:31+5:30
कोल्हापूर : रविवार पेठ, चांदणी चौक येथील दुर्गा ग्रुप येथील लहान मुलांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. ...

खाऊसाठी साठवलेल्या पैशातून गरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटप
कोल्हापूर : रविवार पेठ, चांदणी चौक येथील दुर्गा ग्रुप येथील लहान मुलांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. खाऊसाठी साठवलेल्या पैशातून गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवाजी महाराज यांची मूर्ती प्लास्टरऐवजी आर्टिफिशियल मार्बलची आणली.
दुर्गा ग्रुप येथील रहिवासी असणाऱ्या लहान मुलांनी वर्षभर खाऊसाठी साठवलेल्या पैशातून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते विनायक माने यांनी शिवजयंती साधेपणाने साजरी करून जमा केलेल्या रकमेतून गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा सल्ला दिला. यानुसार सावली माने, वेद माने, मंथन जाधव, अर्पित माने, अभिज्ञ उरुणकर या लहान मुलांनी जमा केलेल्या रकमेत त्यांच्या कुटुंबातील, तसेच परिसरातील काहींनी आणखी पैसे जमा केले. जमा झालेल्या २० हजार रुपयांचे १० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शुक्रवारी करण्यात आले.
फोटो : १९०२२०२१ कोल शिवजयंती मदत न्यूज
ओळी : रविवार पेठ, चांदणी चौक, दुर्गा ग्रुप येथील लहान मुलांनी शुक्रवारी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. खाऊसाठी साठवलेल्या पैशातून गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले.
छाया : नसीर अत्तार