जि. प.च्या त्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:45+5:302021-02-11T04:26:45+5:30
अब्दुललाट : गेली चार वर्षे अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व विजय भोजे हे करीत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता ...

जि. प.च्या त्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करा
अब्दुललाट : गेली चार वर्षे अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व विजय भोजे हे करीत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना विकासकामाबाबत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर गैरव्यवहार आणि गैरकारभाराविरुद्ध सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र, जि. प. सदस्य भोजे यांच्यावर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप जिल्हा परिषदेच्या 'त्या' महिला अधिकाऱ्यांनी केले आहेत. अशा महिला अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी भोजे समर्थकांनी केली आहे. मॅट प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आणि स्वत:च्या नावाची बदनामी लपविण्यासाठी ज्यांनी घोटाळा आणला, त्यांच्या नावाची बदनामी करण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे. आपल्या पदाचा व अधिकाराचा स्वत:च्या स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे भोजे समर्थकांनी सांगितले. यावेळी अरुण पाटील, वृषभ कोळी, संजय कोळी, विष्णू कोळी, शरद पाटील, रमेश चव्हाण, वर्धमान ठगरे, परशुराम कुरणे, तातोबा गडकरी, अक्षय डुणुंग उपस्थित होते.