कसबा सांगाव येेथे अतिक्रमण काढण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:24+5:302021-02-05T07:00:24+5:30

त्यानंतर डी.एम. हायस्कूल व शेती व्यवसाय विद्यामंदिर या शाळेचा बंद करण्यात आलेला जुना रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी ...

Dispute over removal of encroachment at Kasba Sangav | कसबा सांगाव येेथे अतिक्रमण काढण्यावरून वाद

कसबा सांगाव येेथे अतिक्रमण काढण्यावरून वाद

त्यानंतर डी.एम. हायस्कूल व शेती व्यवसाय विद्यामंदिर या शाळेचा बंद करण्यात आलेला जुना रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण करून टाकण्यात आलेले खोके काढण्यावरून पोलीस यंत्रणा, ग्रामविकास अधिकारी व खोकाधारक विनायक आवळे यांच्यांत खडाजंगी झाली. मात्र, ग्रा.पं. प्रशासन हा खोका काढण्यावर ठाम राहिल्याने ॲड. बाबासाहेब मगदूम, बाबय्या स्वामी, विक्रमसिंह माने, सागर माळी, लखन हेगडे, सुदर्शन मजले यांच्यासह अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर विनायक याने स्वत:हून आपला खोका काढून घेण्यास सुरुवात केली. यावेळी पो. काॅन्स्टेबल राजू पाटील, कांबळे यांच्यासह पोलीस बदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

---

एस.पी. कांबळे ग्रा.वि. अधिकारी ग्रा.पं. कसबा सांगाव गत दोन वर्षांपासून दीपक माने याने अतिक्रमण करून नवीन बांधत असलेला प्लाॅटबाबत आरोप- प्रत्यारोप सुरू होते. यापूर्वी दोन वेळा त्याला ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र दीपक हा न्यायालयात गेला होता. त्या ठिकाणी त्याच्या विरोधात निकाल झाला असल्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली, असे ग्रामविकास अधिकारी एस.पी. कांबळे यांनी सांगितले.

---- चौकट:

गावातील अन्य अतिक्रमणाचे काय, ग्रामस्थांचा सवाल

गावात सुमारे १९० खोकीधारक ग्रामपंचायतीच्या जागेत व्यवसाय करीत आहेत. एका माजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने सुमारे तीन गुंठे मोक्याची जागा हडप करून बांधकाम केले आहे. त्याबाबत ग्रा.पं.ने काय केले, असा सवाल करीत अतिक्रमण काढताना सरसकट काढावे, जाणीवपूर्वक अन्याय का करता, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. या कारवाईवेळी ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थितीचीही चर्चा घटनास्थळी सुरू होती.

-

-

फोटो कॅप्शन. : कसबा सांगाव (ता. कागल) येथे गट नंबर ४९२ मधील पक्क्या घराचे व केबिनचे अतिक्रमण हटवताना ग्रामपंचायत कर्मचारी.

Web Title: Dispute over removal of encroachment at Kasba Sangav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.