शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री हसन मुश्रीफ अन् प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात फाईट; सीएस दालनातील गेली लाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:04 IST

रुग्णालयावर मालकीबाबत दोन्हीकडून दावे, प्रतिदावे : जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सावित्रीबाई फुले सर्वोपचार रुग्णालयाच्या मालकीवरून वाद निर्माण झाला असून दोन्हीकडून दावे, प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या दालनातील विद्युत प्रवाह खंडित करण्यात आल्याने समज गैरसमजामध्ये अधिकच भर पडली आहे. त्यामुळे सीपीआरच्या नूतनीकरणापेक्षा हीच चर्चा जोरात सुरू झाली असून, याबाबत डॉ. वाडीकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पत्रही पाठवले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ११ सप्टेंबर २००७ च्या शासन निर्णयानुसार सीपीआर रुग्णालय हस्तांतरित करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून या परिसरातील सर्व इमारतींचे सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सीपीआरच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. येथील विद्युत वाहिन्यांच्या कामासाठी अनेक दालनांमधील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वाडीकर यांना त्यांच्या अंधाऱ्या दालनातून काम करावे लागत आहे. जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय वर्तुळात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली. म्हणून याबाबत अधिक माहिती घेतली असता हा वाद केवळ वीज जाण्यापुरता नसून या रुग्णालयावर नेमकी मालकी कुणाची याबाबतचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाल्यानंतर त्यांची आवश्यक स्वतंत्र रुग्णालये बांधली गेली नसल्याने अजूनही अनेक ठिकाणी ही रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाकडेच राहिली आहेत. अशी रुग्णालये परत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परत घेण्यासाठी ६ फेब्रुवारी आणि ३० मे २०२३ रोजी तत्कालीन सहसचिवांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी लेखी कळवले होते. यामध्ये कोल्हापूरच्या सीपीआरचाही समावेश होता.

दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्र लिहून त्यांचे दालन, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यालय, समाजसेवा अधिक्षक कार्यालय, स्थायी वैद्यकीय मंडळ, जन्म, मृत्यू कार्यालय हे दोन दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत सूचित केले होते. तसेच मुख्य इमारतीतील विद्युत आणि इंटरनेटचे काम करावयाचे असल्याने चार दिवस विजेची समस्या उद्भवू शकते, असेही पत्रात नमूद केले होते.

‘लोकमत’ने उघडकीस आणला वादजिल्हा शल्यचिकित्सकांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाच्या कामावेळी तेथील दगडी कोरीव काम केलेले खांब गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे हा वाद समोर आला असून, या बातमीनंतरच जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पत्र लिहून वस्तुस्थिती मांडून मार्गदर्शनाची विनंती केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनाचे नूतनीकरण होऊन हे दालन पुन्हा मिळेल, याची शाश्वती नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने हे रुग्णालय पुन्हा ताब्यात घ्यावे, यासाठी पत्र दिल्यानंतरही ते अजूनही ताब्यात देण्यात आलेले नाही. तसेच निवासस्थानाच्या नूतनीकरणाबाबत आमच्या कार्यालयास कोणीही कोणतीही सूचना दिलेली नाही. माझ्या अपरोक्ष कामाची सुरुवात करण्यात आली आहे. - डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, कोल्हापूर 

सीपीआरच्या मुख्य इमारतीमधील नूतनीकरणासाठी लेखी पत्र देण्यात आले होते. हे रुग्णालय २००७ सालीच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्चमधील या कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली आहे. तत्पूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपले दालन परत मिळणार नाही, या भीतीतून तक्रार करण्यात आली आहे. - डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Fight Over CPR Hospital Ownership; Doctor's Office Loses Power

Web Summary : A dispute over the ownership of CPR hospital between medical education and public health departments escalates. A doctor's office lost power, fueling the controversy. Renovation work continues amidst the ownership battle, prompting official complaints.