शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंची निवड, कोल्हापुरातील उद्धवसेनेत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:45 IST

ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कोल्हापूर : उद्धवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांची शुक्रवारी नियुक्ती झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने संपर्क नेते, माजी खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ही नियुक्ती केली. इंगवले यांच्या निवडीनंतर ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पक्षाचे उपनेते म्हणून जबाबदारी दिल्यानंतर पक्षाने नवीन जिल्हाप्रमुखांचा शोध सुरू केला होता. या पदासाठी इंगवले यांच्यासह पक्षाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव इच्छुक होते. पक्षाने इंगवले यांच्यावर जबाबदारी सोपवली.संजय पवार नाराज

इंगवले यांची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेत नाराजीची मशाल धुमसू लागली. रविकिरण इंगवले आणि शिवसेना ठाकरे गटातील उपनेते संजय पवार यांच्यात पहिल्यापासूनच वाद असल्याने पवार नाराज झाले. त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील नाराजी ठाकरे गटाला आणखी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

पक्षात काहीसी मरगळ आली होती, ती झटकून सामान्य माणसांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरू. मतदारांची घुसखोरी झाली नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी, महायुतीचा सुपडासाफ करेल. - रविकिरण इंगवले (जिल्हाप्रमुख, उद्धवसेना)