शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 11:13 IST

Zp Kolhapur- जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे हे समिती सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत नाहीत. तेव्हा त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सभापती स्वाती सासने यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी मित्तल यांची गुरुवारी दुपारी भेट घेतली व निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

ठळक मुद्देजिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा समिती सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

 कोल्हापूर -जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे हे समिती सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत नाहीत. तेव्हा त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सभापती स्वाती सासने यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी मित्तल यांची गुरुवारी दुपारी भेट घेतली व निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून या विभागाला ३६ कोटी प्राप्त झाले आहेत. या निधीचे वितरण करण्याचा अधिकार समाजकल्याण समितीला आहे. परंतु घाटे यांनी निधी वितरणाची परस्पर यादी तयार केली असून, त्यांनी काहीजणांना निधी मंजूर झाल्याची माहिती दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. समितीचे अधिकारी सचिव म्हणून घाटे वापरत आहेत.

दिव्यांग विभागाच्या योजना ठरविणे, लाभार्थी निवड करणे यातील अनेक बाबी समाजकल्याण सभापती व सदस्यांना सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेपूर्वी कार्यमुक्त करावे, अन्यथा प्रवेशद्वारावर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १९ जानेवारी रोजी होणाऱ्या समाजकल्याण समितीच्या बैठकीस सचिव म्हणून घाटे यांना बसू देणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे.समिती सदस्य सुभाष सातपुते, पांडुरंग भांदिगरे, सविता चौगले,मनीषा कुरणे, कोमल मिसाळ, परवीन पटेल, विशांत महापुरे, महेश चौगले, अशोकराव माने, मनीषा माने यांच्या निवेदनावर सह्या आहेत.पालकमंत्र्यांची घेणार भेटसर्व सदस्य आता पालकमंत्री सतेज पाटील यांचीही भेट घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरण करण्यात येत असल्याचे सदस्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे त्याची खातरजमा करण्यासाठी हे सर्वजण पाटील यांना भेटणार आहेत. निधीचे वितरण करण्याचा अधिकार हा समाजकल्याण समितीलाच असल्याचे यावेळी सभापती स्वाती सासने यांनी ठासून सांगितले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर