जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासह दालनाचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:50+5:302021-05-24T04:23:50+5:30

कोल्हापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील हे शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मागील दोन दिवसात वावर असलेल्या जिल्हा परिषदेतील ...

Disinfection of the hall including the residence of the Zilla Parishad President | जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासह दालनाचे निर्जंतुकीकरण

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासह दालनाचे निर्जंतुकीकरण

कोल्हापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील हे शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मागील दोन दिवसात वावर असलेल्या जिल्हा परिषदेतील दालनांचे रविवारी हायपोक्लोराईड व सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात आले. यात अध्यक्षांच्या निवास्थानासह त्यांचे जिल्हा परिषदेतील दालन, पक्षप्रतोद कार्यालय, समिती सभागृह यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अध्यक्ष पाटील हे शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आधीच क्वारंटाईन केेले आहे. त्यादिवशी त्यांच्यासमवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता मनिष पवार हे बैठकीला उपस्थित होते. शिवाय अध्यक्षांचे दोन खासगी आणि दोन कार्यालयातील स्वीय सहाय्यकांसह दोन चालकांनादेखील गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

फोटो: २३०५२०२१-कोल-झेडपी

फोटो ओळ: जिल्हा परिषदेचे अध्यक्षच कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने रविवारी त्यांच्या दालनासह जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यालये प्रशासनाने सॅनिटाईज करुन घेतली.

Web Title: Disinfection of the hall including the residence of the Zilla Parishad President