शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 16:41 IST

अचानक घडलेल्या नाट्याने निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये गेली दोन दिवस कमालीची घालमेल

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर व सहयोगी सदस्य, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने येथे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अचानक घडलेल्या नाट्याने निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये गेली दोन दिवस कमालीची घालमेल सुरू झाली आहे. राज्यातील एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजप व शिंदे गट मिळून सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता असून त्यामध्ये जिल्ह्यातील तिघांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र सन २०१४ पासून येथे शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार निवडून आणून जिल्हा भगवामय केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी व तडजोडीच्या राजकारणाने पक्षाला सपाटून हार पत्करावी लागली. प्रकाश आबीटकर यांच्या रुपाने एकमेव आमदार निवडून आले. शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष निवडून आले. त्यांनी शिवबंधन बांधल्यानंतर राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत आबीटकर व पाटील-यड्रावकर हे गेल्याने शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची गेली दोन दिवस घालमेल सुरू आहे.

राजकीय उलथापालथीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची आशा बळावली आहे. सध्या राज्यात सत्तांतर झालेच तर कोणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते, याविषयी चर्चेला ऊत आला आहे. या सरकारमध्ये कोल्हापूरला चांगली संधी मिळू शकते. बंडात शिंदे यांच्यासोबत राहिलेले प्रकाश आबीटकर यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच आमदार विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.

कोणता झेंडा घेऊ हाती.....

शिवसेनेत बंडाळी माजल्याने आता माजी आमदारांसह पक्ष नेते, उपनेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

निष्ठावंतांना अश्रू अनावर..

जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे शिवसैनिक कार्यरत आहेत. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीने कट्टर शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झालेत.

दोन्ही खासदार मुंबईत

मोठ्या प्रमाणात आमदार बाजूला गेल्याने शिवसेना नेतृत्वाने सावध हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे बुधवारी मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘वर्षा’वर होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash abitkarप्रकाश आबिटकरPrakash Awadeप्रकाश आवाडेVinay Koreविनय कोरे