शासनाचा सहकार मोडण्याचा डाव-‘लोकमत’ वृत्ताची चर्चा

By Admin | Updated: December 19, 2014 00:25 IST2014-12-18T21:56:37+5:302014-12-19T00:25:13+5:30

डिसोझा यांचा आरोप : कृती समिती स्थापन; ‘निवडणूक निधी’ला तीव्र विरोध

Discussion about the "right-spoken" story of the government's collapse | शासनाचा सहकार मोडण्याचा डाव-‘लोकमत’ वृत्ताची चर्चा

शासनाचा सहकार मोडण्याचा डाव-‘लोकमत’ वृत्ताची चर्चा

गडहिंग्लज : सर्वसामान्य माणसांच्या गरजांमधून विविध सहकारी संस्थांची निर्मिती झाली. या संस्थांच्या मदतीमुळेच सामान्य माणसाची प्रगती झाली. मात्र, प्राधिकरणाच्या माध्यमातून सहकारी संस्था मोडीत काढण्याचाच शासनाचा डाव आहे, असा आरोप आजरा तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी केला.
राज्य सहकारी प्राधिकरणाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्गमित परिपत्रकातील निवडणूक निधीविषयी विचारविनिमयासाठी येथील देखरेख संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्राधिकरणाने आकारलेल्या निवडणूक निधीस यावेळी तीव्र विरोध करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, सहकारी संस्थांमधील सभासदांच्या पैशाची काळजी घेण्याबरोबरच निवडणुकीतील उधळपट्टी थांबायला हवी. सहकार वाचविण्यासाठी व्यापक लढ्याची गरज आहे.
अरुण देसाई म्हणाले, सहकाराच्या शुद्धिकरणासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली, ही चांगली बाब असली तरी अवाजवी निवडणूक निधीची अट अन्यायकारक आहे.
सुरेश पोवार म्हणाले, शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला धोका आहे. त्याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाची गरज आहे.
दरम्यान, प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत झाला.
यावेळी भिवा जाधव, शांताराम हजगूळकर, रखमाना आपगे, हणमंत साठे, प्रकाश कोरी, सिदनाईक यांनीही मनोगते व्यक्त केली.
बैठकीस जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक संगाप्पा साखरे, गडहिंग्लज तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजू खलिफा, दुंडाप्पा हिडदुगी, शिवाजीराव मगदूम, आदी उपस्थित होते. रमेश चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


‘लोकमत’ वृत्ताची चर्चा
निवडणूक प्राधिकरणाच्या अन्यायी परिपत्रकाविरूद्ध सहकारी संस्था एकवटल्याची बातमी ‘लोकमत’ने आज, गुरूवारच्या अंकात प्रसिद्ध केली होती. बैठकीत या बातमीची चर्चा झाली. ‘लोकमत’चा अंक हातात घेऊनच काही संस्था प्रतिनिधींनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली.
कृती समितीची स्थापना
प्राधिकरणाच्या अन्यायी परिपत्रकाविरूद्ध संघर्षासाठी गडहिंग्लज उपविभागातील सहकारी संस्था प्रतिनिधींची कृती समिती स्थापन झाली. आजऱ्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अरूण देसाई, सुरेश पोवार, राजू खलिफा (गडहिंग्लज), शांताराम हजगुळकर, सूर्यकांत पाटील, विलास नार्वेकर (चंदगड), आनंदराव कुंभार, एस. बी. चव्हाण (आजरा) व निमंत्रित सदस्य म्हणून राजेंद्र गड्ड्यान्नावर यांचा समावेश आहे.

Web Title: Discussion about the "right-spoken" story of the government's collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.