पीककर्जाची माहिती पोहोचवा

By Admin | Updated: November 20, 2015 00:31 IST2015-11-20T00:27:44+5:302015-11-20T00:31:09+5:30

आढावा बैठक : दादा भुसेंचे अधिकाऱ्यांना आवाहन; प्राधान्याने कर्ज देण्याचा विचार करा

Disclose the information of crop | पीककर्जाची माहिती पोहोचवा

पीककर्जाची माहिती पोहोचवा

कोल्हापूर : टंचाईची परिस्थिती असल्यामुळे पीककर्जाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत. पुढच्या पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनासाठी कर्ज देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी येथे केले.राजारामपुरी येथील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) हर्षवर्धन चव्हाण, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा येथील सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पहिल्या वर्र्षी कर्जाचे व्याज शासन भरेल, त्यानंतर पुढील वर्षाचे कर्जाचे व्याज शेतकऱ्यांकडून निम्मे व शासनामार्फत निम्मे भरले जाईल. न्यायालयाने दिलेल्या सूचना तसेच अस्तित्वातील शासन निर्णयाप्रमाणे ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींची रक्कम परत करण्यासाठी योग्य नियोजन करावे. शासनाने दिलेल्या रकमेच्या परताव्याची स्थिती, न्यायप्रविष्ट प्रकरणांची स्थिती, अन्य प्रकरणे यांचाउपनिबंधक महेश काकडे यांनी स्वागत केले. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक बी. बी. यादव, साताराचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक जी. बी. वाघ, सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तालुका उपनिबंधक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कर्जमुक्त करा --शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनार्थ विविध संस्थांकडून कर्ज दिले जाते. या कर्जाच्या रकमेइतकी व्याजाची परतफेड झाली असल्यास त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीच्या प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या मुद्दलाइतक्या रकमेची परतफेड झालेली असल्यास सहकार कायद्यातील कलम ४४ प्रमाणे त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे.

Web Title: Disclose the information of crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.