शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दूधगंगा धरणातून ३५०० क्युसेकने विसर्ग सुरू, धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:32 IST

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणात २०.९२ टीएमसी म्हणजे ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. परिचलन सुचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाच्या सांडव्यावरून २ हजार क्युसेक्स व वीजनिर्मिती गृहातून १५०० क्युसेक, असा एकूण ३५०० क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी विसर्गामुळे दूधगंगा नदीपात्रामधील पाणी पातळीत वाढ होत आहे. दुधगंगा नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.राधानगरी तालुक्यात गेले चार दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची संततधार सुरू असून, काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. रविवारी धरण परिक्षेत्रात ७० मिमी, तर आजअखेर २६७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. योग्य पाणीपातळी ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू केला आहे.पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठावरील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीपात्रमध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.