शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हा'पूर'! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 22:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित 7 दरवाजे उघडले असून, 11400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 67391, तर अलमट्टीमधून 303525 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेने 45.10 फूट इतकी पातळी गाठली असून 93 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उद्या (सोमवारी) सुट्टी जाहीर केली आहे.हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून उद्या सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरुन मिरजेसाठी अतिरिक्त 5 बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. आजरा ते गडहिंग्लज मार्गावरील गिजवणे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी उत्तुर मुमेवाडीमार्गे वळविण्यात आली आहे.वाघबिळ ते पन्हाळगड मार्गावर मोठी भेग पडल्याने तसेच दरड कोसळल्याने पन्हाळगडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सांगलीकडून कोल्हापूर मार्गावर शिरोली नाक्यावर सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी नागाव फाट्यामार्गे वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे पूर परिस्थितीची आज पाहणी केली. कोयनेमधून 67391, धोममधून 10000, कन्हेरमधून 16820 तर वारणामधून 20472 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. कृष्णा नदीतील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती धोक्याची पातळी 45 फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करु नये. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.१९८९ ला पंचगंगेच्या पुराची पातळी ५० फूट सहा इंच इतकी होती. २००५ ला ४९ फूट सहा इंच इतकी होती. आता ४६ फुटांपर्यंत पाणी पोहोचले आले. रेड झोनसंबंधी १९८९ चा पाटबंधारे विभागाचा अध्यादेश आहे, तो आजही कायम आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर