शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:09 IST

राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दिवसभर मुंबईत होते

कोल्हापूर : चंदगड, करवीर आणि कोल्हापूर उत्तरमध्येमहायुतीमध्ये विसंवाद असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी ठरलेली आहे. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर हे उमेदवारी निश्चित मानून उद्या अर्ज दाखल करणार आहेत तर सत्यजित कदम यांनी अजूनही आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. मुंबईतील भेटीगाठी आटोपून खासदार धनंजय महाडिक हे मंगळवारी पुण्यात आले आहेत. ते जिल्ह्याचे प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार आहेत.दुसरीकडे चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हेे या ठिकाणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गतवेळी भाजपचेच अशोक चराटी आणि रमेश रेडेकर यांनी त्यांचा विजय रोखल होता. यावेळी चराटी यांनीच पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी निश्चित आहे. परंतु या ठिकाणी महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य’च्या विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी युतीमध्येच मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकडे इचलकरंजीमध्येही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी सुरेश हाळवणकर यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना काहीही झाले तरी भाजपचेच काम करण्याची ताकीद दिली आहे.

भाजपचे प्रमुख पदाधिकारी जाणार पुण्यालाभाजपचे जिल्ह्यातील प्रमुख ५० हून अधिक पदाधिकारी हे गुरुवारी कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. पाटील हे दुसऱ्यांदा कोथरूड मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत.

क्षीरसागर मुंबईतराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दिवसभर मुंबईत होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझी उमेदवारी अडीच वर्षांपूर्वीच निश्चित झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkarvir-acकरवीरchandgad-acचंदगडMahayutiमहायुती