दिव्यांग लाभार्थी, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:02+5:302021-06-18T04:17:02+5:30
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी, परदेशी जाणारे विद्यार्थी व नोकरीनिमित्त परदेशात जाणारे नागरिकांना तालुकास्तरावरील १२ केंद्रांवर सोमवारी सकाळी ...

दिव्यांग लाभार्थी, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी कोरोनाची लस
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी, परदेशी जाणारे विद्यार्थी व नोकरीनिमित्त परदेशात जाणारे नागरिकांना तालुकास्तरावरील १२ केंद्रांवर सोमवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत कोरोना लस दिली जाणार आहे. लाभार्थ्यांनी आपल्याकडील कागदपत्रांसह जवळच्या ग्रामीण रुग्णालयांत नावनोंदणी करावी, असे आवाहन जि. प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
कोरोना लस आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले, कागल, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, करवीरसाठी ग्रामीण रुग्णालय गांधीनगर, पन्हाळासाठी उपजिल्हा रुग्णालय कोडोली, राधानगरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तारळे, शाहूवाडीसाठी ग्रामीण रुग्णालय मलकापूर या ठिकाणी दिली जाणार आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यापूर्वी त्यांनी अपंगत्वाचा दाखला, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी केल्याचा पुरावा, आधार कार्डसह ग्रामीण रुग्णालयात नावनोंदणी करावी. दिव्यांग लाभार्थी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या घराजवळील केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.
परदेशात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्ती उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छित असतील त्यांनीही संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट, व्हिसा, परदेशात उच्च शिक्षण किंवा नोकरीकरिता निवड झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
सर्व कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित लाभार्थ्याला कोरोनाची लस दिली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहेत.