गांधीनगरात ४० लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST2021-01-09T04:19:04+5:302021-01-09T04:19:04+5:30

गांधीनगर : गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण निधीचे वाटप करवीर पंचायत ...

Disability funds distributed to 40 beneficiaries in Gandhinagar | गांधीनगरात ४० लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

गांधीनगरात ४० लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

गांधीनगर : गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण निधीचे वाटप करवीर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गांधीनगरच्या सरपंच रितू लालवानी उपस्थित होत्या.

चाळीस दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने स्वनिधीतून हे वाटप केले. यावेळी गांधीनगरचे ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, उपसरपंच सोनी सेवलानी, ग्रामपंचायत सदस्य दीपक जमनानी, प्रशांत कुलकर्णी, कल्पना टोमके, नयना आडवाणी, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख उत्तम चौगुले, अमोल एकळ, अरुण हावळ, अरुण अवघडे उपस्थित होते.

फोटो ०८ गांधीनगर दिव्यांग निधी

ओळ

गांधीनगर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसभापती सुनील पोवार, सरपंच रितू लालवानी, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Disability funds distributed to 40 beneficiaries in Gandhinagar