‘कोल्हापूर कॉलिंग’ची दिशा सकारात्मक हवी
By Admin | Updated: November 21, 2015 00:29 IST2015-11-20T23:35:11+5:302015-11-21T00:29:06+5:30
अमित सैनी : ‘कोल्हापूर कॉलिंग’च्या ‘मोबाईल अॅप’चे अनावरण

‘कोल्हापूर कॉलिंग’ची दिशा सकारात्मक हवी
कोल्हापूर : ‘कोल्हापूर कॉलिंग’ या संस्थेची दिशा ही ‘लोकशाही दिना’सारखी तक्रारींची न राहता सकारात्मक असावी, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी येथे दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोल्हापूर कॉलिंग’च्या ‘मोबाईल अॅप’चे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. सैनी व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. सैनी बोलत होते. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, पारस ओसवाल, सूर्यकांत दोडभिसे, संजय पाटील उपस्थित होते. डॉ. सैनी म्हणाले, ‘कोल्हापूर कॉलिंग’ या संस्थेची भूमिका ही प्रशासनविरोधी न राहता सामान्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असावी. लोकांमधील नकारात्मक भाव बदलण्याचे काम संस्थेने करावे.पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले, कोल्हापूरमध्ये प्रत्येक प्रश्नांवर विरोध करणारी मंडळी खूप आहेत. ‘कोल्हापूर कॉलिंग’ म्हणजे एखादी कृती समिती होऊ नये, याची दक्षता घ्यावी. सकारात्मक भूमिका घेऊन पुढे गेल्यावर तुमच्यासोबत नवीन माणसे जोडली जातील. चांगल्या माणसांच्या समर्थनार्थ या संस्थेने उभे राहावे.
ओसवाल म्हणाले, ‘कोल्हापूर कॉलिंग’ ही संस्था प्रशासनाशी समन्वय ठेवून काम करणारी आहे. कोणाला विनाकारण विरोध करायचा नाही व चुकीचे काम होऊ द्यायचे नाही, हा आमचा उद्देश आहे.दोडभिसे म्हणाले, या अॅप्समध्ये पर्यावरण, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, असे विविध बारा गट केले आहेत. याद्वारे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.यावेळी कॅप्टन सुरेश खाडिलकर, विनायक रेवणकर, उज्ज्वल नागेशकर, अमोल कोरगावकर, शरद मिराशी, महेश धर्माधिकारी, गिरीश आरेकर, जय भोसले, अरुण मराठे, अण्णासाहेब माळी, उपस्थित होते.