टोलविरोधी आंदोलनाची दिशा आज ठरणार

By Admin | Updated: October 17, 2014 00:51 IST2014-10-17T00:51:19+5:302014-10-17T00:51:58+5:30

कृती समितीची बैठक : कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

The direction of the anti-toll movement will be decided today | टोलविरोधी आंदोलनाची दिशा आज ठरणार

टोलविरोधी आंदोलनाची दिशा आज ठरणार

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापुरातील टोलला आव्हान देणाऱ्या मंगळवारी (दि. १४) सर्व याचिका फेटाळून टोलला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने तत्काळ टोलच्या अंतिम लढ्याचे रणशिंग फुंकले होते. भविष्यातील टोलविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या, शुक्रवारी पाच वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृ ती समितीने पत्रकाद्वारे केले आहे. गेली साडेतीन वर्षे रस्त्यावर अन् न्यायालयात टोलविरोधात कोल्हापूरची जनता लढा देत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. कृती समितीने ताबडतोब शिरोली टोलनाक्यावर धरणे आंदोेलन करून या निर्णयाचा निषेधही केला होता. भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कृती समितीची व्यापक बैठक होत आहे. ऐन दिवाळीत टोलविरोधातील आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

आंदोलनाची धग वाढणार
लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम टोलविरोधी आंदोलनावर झाला होता. राजकीय टीका-टिप्पणीमुळे अनेकांनी पडद्यामागेच राहणे पसंत केले होते. आता निवडणुकीचे वातावरण निवळले आहे. जनतेसोबत असल्याचे दाखविण्याची चढाओढ नेत्यांत सुरू होणार आहे. त्यामुळे टोलविरोधी आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे.

नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना खडसावले
शहरातील टोलनाक्यांवरील (पथकर) कर्मचाऱ्यांना ‘कोणत्याही चारचाकी वाहनांच्या चालकांवर टोलची सक्ती करू नका’, असे आज, गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडसावले. दुपारी शिरोली, शाहू, सरनोबतवाडी, कळंबा, आदी टोलनाक्यांवर टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते गेले. या नाक्यांवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही वाहनचालकावर टोलची सक्ती करू नका, असे सांगितले. यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, आदी उपस्थित होते.

Web Title: The direction of the anti-toll movement will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.