थेट पाईपलाईनवरून प्रशासन-सदस्यांत जुंपणार

By Admin | Updated: July 19, 2014 00:22 IST2014-07-19T00:21:26+5:302014-07-19T00:22:11+5:30

महापालिका : विशेष महासभेचा डावही रेंगाळल्याची चर्चा

From the direct pipelines, admin-members will jump in | थेट पाईपलाईनवरून प्रशासन-सदस्यांत जुंपणार

थेट पाईपलाईनवरून प्रशासन-सदस्यांत जुंपणार

कोल्हापूर : स्थायी समितीकडे गेले पंधरा दिवस अडकून पडलेला थेट पाईपलाईनचा ठराव अखेर आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, निविदेला आव्हान देणारे काही मुद्दे उपसूचनेसह सदस्यांनी जोडल्याने प्रशासन व सभागृह आमने-सामने येण्याची शक्यता आहे. २८ जुलैला महापालिकेची नियमित मासिक सभा होणार आहे. नेत्यांचा रोष कोणी घ्यायचा, या वादात योजनेवर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्याचा डावही रेंगाळल्याची चर्चा महापालिकेत आहे.
रस्ते प्रकल्पाचे खापर महापालिकेवर फोडण्यात येत आहे. या प्रकल्पासारखी फसगत नको म्हणून नगरसेवकांनी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी महासभेची मागणी केली होती. या सभेत संपूर्ण प्रकल्पाच्या सर्वांगानी चर्चा होऊन शंका-समाधान झालेच पाहिजे. ४८९ कोटींच्या योजनेबाबत शहरवासीयांसह नगरसेवकांच्या मनात किंतू नको, यासाठी सभा घेण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, महासभा घेऊन योजनेला फाटे फोडू नका, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने कारभाऱ्यांच्या मनसुब्यांना खोऽऽ बसला.
शहराच्या इतिहासातील या सर्वांत मोठ्या योजनेवर थेट नेत्यांनी अंकुश ठेवला आहे. विशेष सभा तर होणारच नाही, उलट प्रशासन सदस्यांनी सूचविलेल्या पाणीपट्टीत वाढ करू नये, ठेकेदारास आगावू हप्ता देऊ नये, अशा निविदेला आव्हान देणाऱ्या उपसूचना वगळण्याबाबत ठाम असल्याचे समजते.
त्यामुळे नगरसेवकांची मोठी गोची होणार आहे.
थेट पाईपलाईनबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेऊ लागल्याची भावना झाल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच प्रशासन व सभागृह यांच्यातील सामना भविष्यात अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: From the direct pipelines, admin-members will jump in