थेट पाईपलाईनची निविदा शासनाकड
By Admin | Updated: July 18, 2014 00:52 IST2014-07-18T00:41:00+5:302014-07-18T00:52:27+5:30
उपसूचनांचा खोडा : सभागृह-प्रशासनातील ताकतुंबा थांबलो

थेट पाईपलाईनची निविदा शासनाकड
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष सभा न घेता पाईपलाईन योजना मार्गी लावा, अशा दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत आज, गुरुवारी दोन सदस्यांनी उपसूचना सादर केल्या. योजनेबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच महासभाही घेण्यात येणार आहे. दरम्यान, स्थायी समितीने आज नेत्यांच्या दबावामुळे निविदा मंजूर करून प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केली.
थेट पाईपलाईन निविदेवरून महापालिकेत गेले दोन दिवस कमालीच्या घडामोडी घडत आहेत. स्थायी समितीने गेल्या आठवड्यातच निविदा मंजूर केली. मात्र, काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याने निविदा स्थायीकडेच पडून राहिली. थेट पाईपलाईनबाबत असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी नगरसेवकांसह काही स्थायी सदस्यांनी केली.
दरम्यान, योजनेला फाटे फोडू देऊ नका, विशेष सभा न घेता निविदा मंजूर करून योजना मार्र्गी लावा, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्र्यांनी देऊनही ४८ तास निविदा स्थायी समितीक डे पडून होती.
स्थायी समिती सदस्य आदिल फरास व यशोदा मोहिते यांनी उपसूचना सादर केल्यानंतर आज सायंकाळी निविदा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मात्र, विशेष सभेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चार स्थायी सदस्य सभेची मागणी करणारे पत्र उद्या, शुक्रवारी महापौर सुनीता राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे. निविदा मंजूर झाल्याने सभेतील चर्चेला काही ‘अर्थ’ राहिला नसल्याने नेत्यांनीही या सभेकडे दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)