थेट पाईपलाईनला मुहूर्त

By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:52:32+5:302014-08-17T00:53:07+5:30

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते २४ किंवा २६ ला प्रारंभ

Direct to Pipeline | थेट पाईपलाईनला मुहूर्त

थेट पाईपलाईनला मुहूर्त

कोल्हापूर : दीर्घकालीन लढ्याचे प्रतीक बनून गेलेल्या आणि मंजुरीनंतरही वादग्रस्त बनत चाललेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दि. २४ किंवा २६ आॅगस्ट रोजी होत आहे. योजनेची वर्क आॅर्डर तातडीने द्या आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, असे आदेश पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल, शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
पालकमंत्री पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती सांगितली. कोल्हापूरकरांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत आहे, याचा आपणाला आनंद वाटतो, असे पालकमंत्री म्हणाले. या योजनेच्या प्रारंभासंदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यांनी २४ किंवा २६ आॅगस्टला येण्याचे मान्य केले आहे. नेमक्या कोणत्या दिवशी प्रारंभ करायचा, याचा निर्णय दोन दिवसांत होईल, असे त्यांनी सांगितले. पुढच्या तीन वर्षांत ही योजना पूर्ण करावयाची आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Direct to Pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.