मांडरे येथे भावजयीच्या निधनाच्या धक्क्याने दिराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:08+5:302021-01-13T05:03:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी भगवान पाटील ...

मांडरे येथे भावजयीच्या निधनाच्या धक्क्याने दिराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी भगवान पाटील (वय ६२) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांचे दीर सदाशिव रामचंद्र पाटील (वय ६५, रा. मांडरे, ता. करवीर) यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण मांडरे गावावर शोककळा पसरली आहे.
कराड येथे लक्ष्मी पाटील यांचा मृत्यू झाला. शनिवार (दि. ९) रोजी सायंकाळी मांडरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करून घरी परत येताच सदाशिव पाटील यांचा मृत्यू झाला. ते प्रगतशील शेतकरी होते. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. बी. आर. पाटील यांचा गावातील सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. परिसरातील लोकांच्या अत्यावश्यक सेवेसाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी रूग्णवाहिका प्रदान केली आहे. शनिवारी त्यांच्या पत्नीच्या निधनापाठोपाठ थोरल्या भावाच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो ०९ लक्ष्मी पाटील
०९ सदाशिव पाटील