विरोधी आघाडीला दिनकर कांबळे यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:36+5:302021-04-27T04:24:36+5:30

गोकुळ निवडणूकसंदर्भात अजिंक्यतारा येथे गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला ...

Dinkar Kamble's support to the opposition | विरोधी आघाडीला दिनकर कांबळे यांचा पाठिंबा

विरोधी आघाडीला दिनकर कांबळे यांचा पाठिंबा

गोकुळ निवडणूकसंदर्भात अजिंक्यतारा येथे गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील ‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण डोंगळे, विश्वासराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंबा दिला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, दूध उत्पादक सभासदांच्या हितासाठी आम्ही लढत आहोत .त्यामुळे जिल्ह्यातील ठरावधारकांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

दिनकर कांबळे म्हणाले, ना. मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांचा संघर्ष हा गोकुळ वाचावे यासाठी आहे. त्यामुळे शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, खानापूर माजी सरपंच भुजंगराव मगदूम, प्रा.शाम पाटील, संदीप कांबळे, आंबवनेचे माजी सरपंच बाळासाहेब गुरव, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

अजिंक्यतारा येथे विरोधी आघाडीला माजी संचालक दिनकर कांबळे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सत्कार करताना मंत्री सतेज पाटील, सचिन घोरपडे, बाळासाहेब गुरव, भुजंगराव मगदूम आदी.

Web Title: Dinkar Kamble's support to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.