दिनेश कदम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST2021-07-23T04:16:06+5:302021-07-23T04:16:06+5:30

कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील तारांगणमधील दिनेश रामचंद्र कदम (वय ९४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Dinesh Kadam passes away | दिनेश कदम यांचे निधन

दिनेश कदम यांचे निधन

कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील तारांगणमधील दिनेश रामचंद्र कदम (वय ९४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी सकाळी कदमवाडी स्मशानभूमीत आहे. महाभारत कन्स्ट्रक्शनचे जयेश कदम यांचे ते वडील होत.

मूळचे कोल्हापूरचे पण बडोदा येथे जन्म झालेले कदम यांनी इलेक्ट्रीक मोटार वायडींगची सुरुवात मुंबईतून केली. कालांतराने कोल्हापुरातील शेतकऱ्यांची सेवा करावी म्हणून ते पुन्हा परतले. त्यांनी ६२ वर्षांपूर्वी शिवाजी पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ वास्तव्य करून हा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे केला. अतिशय कष्टातून जयेश, संजय, सुधीर, उदय या चारही मुलांना शिक्षणाबरोबर सुंस्कारीत केले. ‘आप्पा ’या नावाने ते सर्वपरिचित होते. स्पष्टवक्तेपणासोबत मित्रांवरही त्यांनी पुत्रवत प्रेम केले.

फोटो : २२०७२०२१-कोल-दिनेश कदम (निधन)

Web Title: Dinesh Kadam passes away