दिलीपसिंह पाटील यांचे कार्य दीपस्तंभासारखे : समरजीत घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:18+5:302021-02-05T07:14:18+5:30
कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनतर्फे दिलीपसिंह पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वागत संस्थेचे ...

दिलीपसिंह पाटील यांचे कार्य दीपस्तंभासारखे : समरजीत घाटगे
कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनतर्फे दिलीपसिंह पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वागत संस्थेचे अध्यक्ष ॲड. इंद्रजित पाटील-कौलवकर यांनी केले.
प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव ॲड. अनिरुद्ध पाटील-कौलवकर यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करत दिलीपसिंह पाटील यांनी संस्थेचा कायापालट केला. त्यांचे विचार समाजात रूजविण्याची गरज आहे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबीटकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, माजी आमदार के. पी. पाटील, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-काैलवकर, डी. डी. घाटगे, रत्नेश शिरोळकर, नीलेश देसाई, शिवराज जगदाळे, संजय पाटील, प्रफुल्ल कदम, गणपतराव वारके, आनंद माने आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनतर्फे दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. इंद्रजित पाटील-कौलवकर, ॲड. अनिरुद्ध पाटील-कौलवकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, उदयसिंह पाटील-कौलवकर आदी उपस्थित होते. (फोटो-३१०१२०२१-कोल-आर्य समाज)