दिलीप पोवार यांचे नगरसेवकपद धोक्यात

By Admin | Updated: November 26, 2015 00:34 IST2015-11-26T00:34:24+5:302015-11-26T00:34:24+5:30

विनापरवाना बांधकाम : मनपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विखंडित

Dilip Powar's corporator threatens danger | दिलीप पोवार यांचे नगरसेवकपद धोक्यात

दिलीप पोवार यांचे नगरसेवकपद धोक्यात

कोल्हापूर : महानगरपालिकेवर निवडून येऊन अद्याप महिना झाला नाही तोवरच काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पोवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पदाचा गैरवापर करून तत्कालीन नगरसेविका सरस्वती पोवार व दिलीप पोवार यांनी केलेल्या विनापरवाना बांधकामामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
सरस्वती पोवार व त्यांचे पती दिलीप पोवार यांनी कनाननगर परिसरात विनापरवाना बांधकाम केले आहे. महापालिकेकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण महापालिका अधिनियमांतील कलम (१२) नुसार चौकशीसाठी न्यायाधीशांकडे पाठविण्यास मंजुरी मिळावी म्हणून प्रशासनाने महासभेसमोर प्रस्ताव ठेवला होता, परंतु मनपा सदस्यांनी तो १७ जानेवारी २०१५च्या महासभेत नामंजूर केला. त्यानंतरही प्रशासनाने विधिज्ञांच्या अभिप्रायानुसार हा निर्णय चुकीच्या माहिती व गृहितकांच्या आधारावर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने तोच प्रस्ताव फेरविचारार्थ पुन्हा महासभेकडे सादर करण्यात आला. सदरचा प्रस्तावही २० मार्च २०१५ च्या सभेतही नामंजूर करण्यात आला.
त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासनाचा प्रस्ताव व महासभेने केलेले ठराव राज्य सरकारकडे पाठवून त्यावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. अनधिकृत बांधकामामुळे मनपा कायद्यातील तरतुदींचा भंग होत असल्याने महासभेने मंजूर केलेले दोन्ही ठराव राज्य सरकारने निलंबित केले होते आणि सरस्वती पोवार यांना एक महिन्याच्या आत अभिनिवेदन करण्याची संधी दिली; परंतु त्यांना आपली बाजू मांडता आली नाही. त्यामुळे महापालिकेने मंजूर केलेले दोन्ही ठराव विखंडित केले, तसा आदेश राज्य सरकारचे सह. सचिव प्र. ता. गौड यांनी मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर)ला काढला आहे.

Web Title: Dilip Powar's corporator threatens danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.