राजाराम साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:06+5:302021-06-16T04:34:06+5:30

चेअरमनपदासाठी दिलीप पाटील यांचे नाव संचालक हरीष चौगले यांनी सुचवले त्यास कुंडलिक चरापले यांनी अनुमोदन दिले. यापूर्वी दिलीप ...

Dilip Patil as the Chairman of Rajaram Sugar Factory | राजाराम साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप पाटील

राजाराम साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप पाटील

चेअरमनपदासाठी दिलीप पाटील यांचे नाव संचालक हरीष चौगले यांनी सुचवले त्यास कुंडलिक चरापले यांनी अनुमोदन दिले. यापूर्वी दिलीप पाटील यांना २०१४ साली चेअरमनपदाची संधी मिळाली होती. सलग अडीच वर्षे ते चेअरमन होते. तसेच गेली २० वर्षे ते कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत आहेत. निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप पाटील, साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव व सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी दिलीप पाटील म्हणाले, महाडिक यांनी मला पुन्हा चेअरमनपदाची दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याच्या उत्कर्षासाठी व प्रगतीसाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.

या वेळी व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, माजी आमदार अमल महाडिक, तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस उपस्थित होते.

Web Title: Dilip Patil as the Chairman of Rajaram Sugar Factory