शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:32 IST

‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे. मात्र, संघातील सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नेत्यांचे चार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार विनय काेरे यांचे दोन असे सहा संचालक आहेत. त्यातच खासदार संजय मंडलीक हे सत्तारूढ गटाचे नेते असताना नेमक्या कोणाच्या कारभाराची चौकशी होणार? याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळ (पदुम), मुंबई रा.सं. शिर्के यांनी दिले. यासाठी विशेष लेखापरीक्षक वर्ग, सहकारी संस्था (दुग्ध) अहमदनगर बी.एस. मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. दूध संघात सर्वपक्षीय नेत्यांची सत्ता आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या सत्तेत असलेले जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय काेरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार प्रकाश आबीटकर, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचीच सत्ता आहे.

या नेत्यांचे सहा संचालक आहेत. भाजपच्या नेत्या शौमिका महाडीक यांच्या तक्रारी अर्जानुसार चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळ (पदुम) यांनी दिले, मात्र या आदेशाने या नेत्यांची कोंडी झाली आहे.चौकशी अधिकाऱ्यांपुढे पेच?‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश निघून दोन दिवस झाले आहेत. आदेश काढल्यापासून दहा दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, मंगळवारपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयातून राजकीय घडामोडींना वेग आल्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाल्यानेच विलंब होत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे