शिरगांवचा दिग्विजय बनला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:08+5:302021-02-05T07:02:08+5:30

शिरगाव : कोणाचेही मार्गदर्शन नसताना व महागडा क्लास न घेता केवळ प्रचंड इच्छाशक्ती, जबर आत्मविश्वास, प्रचंड जिद्द व चिकाटी ...

Digvijay of Shirgaon became the Central Industrial Security Force | शिरगांवचा दिग्विजय बनला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

शिरगांवचा दिग्विजय बनला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

शिरगाव : कोणाचेही मार्गदर्शन नसताना व महागडा क्लास न घेता केवळ प्रचंड इच्छाशक्ती, जबर आत्मविश्वास, प्रचंड जिद्द व चिकाटी या चतुःसूत्रीच्या जोरावर राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील दिग्विजय धोंडीराम पोवार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये ‘पोलीस कॉन्स्टेबल’ या पदाचा बहुमान मिळवला. लहानपणापासूनच दिग्विजय पोवार यांना खाकी वर्दीचे आकर्षण होते, तसेच अनेक यशस्वी क्लास वन, क्लास टू शेकडो तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिरगाव हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत व आमदार पी. एन. पाटील ज्युनिअर कॉलेज येथे बारावीपर्यंत तसेच भोगावती महाविद्यालयामध्ये बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. केंद्रीय स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मार्च २०१९ मध्ये परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बौद्धिक, फिजिकल व मेडिकल चाचणीमध्ये यश आल्याने आपली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले .

फोटो =३० दिग्विजय पोवार

Web Title: Digvijay of Shirgaon became the Central Industrial Security Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.