शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्ट : प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:22 IST

‘ट्राय’चे अधिकारी अन् मुंबई पोलिस असल्याची बतावणी

कोल्हापूर : आर्थिक फसवणूकीत सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (७५, रा. सम्राटनगर, सरनाईक माळ, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाख २३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार १८ एप्रिल ते २७ मे २०२५ दरम्यान घडला. 

डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजारामपुरी पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, सम्राटनगर येथील मीना डोंगरे आणि त्यांचे पती मुरलीधर हे दोघे अंध व्यक्तींसाठी स्वयंसेवी संस्था चालवितात. दोघेही सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. मीना यांच्या मोबाइलवर १८ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास व्हॉट्सॲप कॉल आला. ट्रायचे (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी डोंगरे यांच्याविरोधात २ जानेवारी २०२५ रोजी माहीम येथील कुलाबा पोलिस ठाण्यात नरेश गोयल मनी लाँड्रिंग अँड इन्व्हेस्टमेंट फ्रॉड केसमध्ये गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. 

डोंगरे यांना काय सांगण्यात आले? 

डोंगरे यांना सांगण्यात आले की, त्यांच्या आधार कार्डचा वापर करून माहीम येथे एका बँकेच्या शाखेत मनी लाँड्रिंगचे सहा कोटी रुपये जमा झाले असून, याबाबत डिजिटल अरेस्ट करून कायदेशीर कारवाई करणार आहोत. यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे द्यावे लागतील; अन्यथा, प्रत्यक्षात घरी पोलिस पाठवून अटक करू, असे सायबर भामट्यांनी धमकावताच त्या पैसे देण्यास तयार झाल्या. 

१५ वेळा ठेवी मोडल्या  

सायबर भामटे ४० दिवस डोंगरे यांच्या संपर्कात होते. परराज्यातील विविध पाच बँक खात्यांवर त्यांनी आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे १५ वेळा ऑनलाइन रक्कम उकळली. पैसे देण्यासाठी डोंगरे यांनी ठेवीही मोडल्या.

मुलीमुळे प्रकार उघडकीस

काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या मीना डोंगरे यांची डॉक्टर मुलीने विचारपूस केली. त्यानंतर मीना यांनी घडलेला प्रकार सांगितला. सायबर भामट्यांकडून ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंगरे यांनी पोलिसांत धाव घेतली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइम