शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण--सरकारकडून निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:46 IST

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता ...

ठळक मुद्देहंगामाअखेर १० लाख टन निर्यात शक्य

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करणाऱ्या कारखान्यांनाच निर्यात अनुदान देण्यात येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आधीच्या आदेशात म्हटले होते. हे अनुदान प्रती टन ५५ रुपये ऊस उत्पादकाच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये अनेक साखर कारखान्यांनी विशेषत: खासगी साखर कारखान्यांनी साठा मर्यादेचे उल्लंघन करून साखर विकली होती. ते कारखाने साखर निर्यात अनुदानाला अपात्र ठरत होते. निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नाही, असे दिसताच केंद्राने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यात इतर सर्व अटी आहेत, मात्र फेब्रुवारी, मार्चमधील साठा मर्यादेची अट समाविष्ट नाही, त्यामुळे अपात्र ठरणारे अनेक खासगी कारखानेही निर्यात अनुदानास पात्र ठरणार आहेत.कोटा विकण्यास परवानगीसरकारने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यासाठी कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आतापर्यंत कसेबसे कारखान्यांना २ लाख ४४ हजार टन साखर निर्यात करता आली आहे. साखर निर्यात करणे ज्या कारखान्यांना शक्य नाही त्यांनी निर्यात अनुदान मिळविण्यासाठी आपला कोटा अन्य कारखान्यांना विकता येतो. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील साखर कारखाने निर्यात कोटा उत्तर प्रदेशातील कारखान्यांना ७५0 रुपये प्रति क्विंटल या दराने विकत आहेत. अटी शिथिल केल्याने अनुदानास पात्र ठरणारे कारखानेही निर्यात करण्यासाठी किंवा कोटा विकण्यासाठी पुढे येतील. यामुळे चालू साखर हंगामाअखेर म्हणजेच सप्टेंबरअखेर सुमारे दहा लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. ती निर्धारित लक्ष्यापेक्षा निम्मीच लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.उशिरा सुचलेले शहाणपणसाखर निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हा निर्णय दोन-तीन महिन्यांपूर्वी झाला असता तर कारखान्यांना ते सोयीचे ठरले असते. आता पावसाळा सुरू झाला असल्याने निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चीन, श्रीलंका, सुदानला निर्यातसध्या चीन, श्रीलंका, सुदान, सोमालिया आदी देशांना साखर निर्यात होत आहे. आतापर्यंत बंदर जवळ असल्याने महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांनी साखर निर्यात केली आहे. 

साखर निर्यातीच्या अटी शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आणखी साखर कारखाने निर्यातीसाठी पुढे येतील. सप्टेंबरअखेर सुमारे १० लाख टन साखरेची निर्यात होऊ शकेल.- प्रफुल्ल विठलानीअध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.