दिएगो मॅराडोनाचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:58+5:302021-01-08T05:14:58+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त साॅकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट(साई) व फुटबाॅल महासंग्रामतर्फे विख्यात फुटबाॅलपटू ...

Diego will erect a memorial to Maradona | दिएगो मॅराडोनाचे स्मारक उभारणार

दिएगो मॅराडोनाचे स्मारक उभारणार

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त साॅकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट(साई) व फुटबाॅल महासंग्रामतर्फे विख्यात फुटबाॅलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व साॅकर थीम पार्क तसेच ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरिता व्यावसायिक फुटबाॅल प्रशिक्षण केंद्र साकारले जाणार असल्याची माहिती ‘साई’चे सतीश सूर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सूर्यवंशी म्हणाले, जगातील फुटबाॅलप्रेमींच्या ह्दयात स्थान मिळवलेला अर्जेटिनाचा दिग्गज फुटबाॅलपटू दिएगो मॅराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. फुटबाॅलवेड्या कोल्हापुरातही त्याचे असंख्य चाहते आहेत. मॅराडोनाच्या प्रेमापोटी असंख्य चाहत्यांच्या इच्छेखातर कोल्हापुरातही त्याच्या पुतळ्याच्या रुपात स्मारक उभे केले जाणार आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. कोलकाता, गोवा यानंतर तिसरी फुटबाॅल पंढरी म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. त्यामुळे कोल्हापूरचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या उद्देशाने थीम पार्क उभा केला जाणार आहे. यात जगप्रसिद्ध मेस्सी, नेमार, आदी खेळाडूंची शिल्पे असणार आहेत. विशिष्ट प्रकारचा सेल्फी पाॅईंट, खेळणी, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, वाॅकिंग ट्रॅक आदींचा समावेश असणार आहे. फुटबाॅल सातासमुद्रापार जावा, याकरिता ८ ते १४ वर्षाखालील मुला-मुलींकरिता प्रोफेशनल (व्यावसायिक) प्रशिक्षण अकादमी सुरु केली जाणार आहे. यावेळी संताजी भोसले, प्रशांत पवार, योगेश घोरपडे आदी उपस्थित होते.

०६०१२०२१-कोल-मॅराडोना

Web Title: Diego will erect a memorial to Maradona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.