शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेचा कारभार उघडा करू, राजू शेट्टींनी अधिकाऱ्याला घेतले फैलावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 13:30 IST

बँक चोरांची आहे का ? बँक कोणाच्याही मालकीची नाही. शेतकऱ्यांची आहे. शेतकरी सातबारा गहाण ठेवतो म्हणून कर्ज देता. उपकार करीत नाही.

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगताच माजी खासदार राजू शेट्टी मंगळवारी चांगलेच आक्रमक झाले. नियम सर्वांना सारखाच लावायचा. मनमानी पद्धतीने कामकाज करायचे नाही. नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे, असा इशारा त्यांनी दिला. बँकेचे कामकाज एकदम नियमानुसार चालते तर ईडी काय चहा पिण्यासाठी बॅंकेत आली होती का ? अशी विचारणाही शेट्टी यांनी केली.आकिवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले सेवा सोसायटीच्या स्थापनेसाठी अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला जिल्हा बँक देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारपासून अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले यांनी जिल्हा बँकेसमोर उपोषण सुरू केेले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी माजी खासदार शेट्टी, प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, बंडू पाटील, बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ठिय्या मारून पाठिंबा दिला. शेट्टी यांनी बँकेचे अधिकारी माने यांची कक्षात जाऊन भेट घेतली. त्यांनी दाखला का देत नाही, असा जाब विचारला. त्यावेळी माने यांनी बँकेचे नियम आणि धोरण सांगितले. त्यानंतर शेट्टी यांनी आता आम्हाला दाखला नको, पण मला गेल्या सहा महिन्यांत किती सेवा संस्थांना अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला दिला याची माहिती द्या, अशी मागणी लावून धरली. माने यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून ही माहिती देऊ असे सांगितले.संचालक मंडळ विद्वानांचे आहे, त्यांच्या पुढे ठेवा, पण किती दिवसांत माहिती मिळेल हे सांगा, अशी विचारणा केली. याचे उत्तर देण्यास माने टाळाटाळ करीत राहिले. त्यानंतर शेट्टी यांनी माहिती देण्यास चार, पाच की आठ वर्षे लागतील. हे सरकार असेपर्यंत तरी माहिती मिळेल का, अशी विचारणा केली. शेवटी माने यांनी दोन आठवड्यांत माहिती देतो, असे सांगितले. दोन आठवडे म्हणजे १३ जुलैला मी बँकेत येणार आहे. माहिती तयार ठेवा, असा दम शेट्टी यांनी दिला.

संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटलांचा नाच ठेवाराजकीय द्वेषातून अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला देणार नसाल तर राजकारण करीत बँकेत बसा. विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.

बँक चोरांची आहे का ?चेहरा बघून बँकेचा कारभार करणार असाल तर आमच्या संस्थेच्या ठेवी, इतर पैसे द्या, आम्ही राज्य बँकेसोबत थेट व्यवहार करतो, असे शेट्टी यांनी सांगितले. यावर माने यांनी बँक शिखर बँक आहे, असे सांगितले. यावर खवळून शेट्टी म्हणाले, बँक चोरांची आहे का ? बँक कोणाच्याही मालकीची नाही. शेतकऱ्यांची आहे. शेतकरी सातबारा गहाण ठेवतो म्हणून कर्ज देता. उपकार करीत नाही.

यड्रावकरांचा इतिहास संस्था मोडण्याचाचशिरोळचे आमदार आणि बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर हेच राजकारण करून दाखला देण्यास अडथळा करीत आहेत. त्यांचा संस्था मोडीत काढण्याचा आणि बंद पाडण्याचाच इतिहास आहे. त्यांचे ऐकून बँक दाखला देत नसल्याची टीका शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकRaju Shettyराजू शेट्टीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय