वडगावात धूम स्टाईलने गंठणची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:42+5:302021-07-07T04:31:42+5:30
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिकबिरे या घरासमोरील व्हरांड्यात भाजी निट करत बसल्या होत्या. या वेळी दोन माहीतगार ...

वडगावात धूम स्टाईलने गंठणची चोरी
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिकबिरे या घरासमोरील व्हरांड्यात भाजी निट करत बसल्या होत्या. या वेळी दोन माहीतगार चोरट्यांनी घराच्या गेटमधून डाॅक्टर आहेत का? तसेच घरातील कुत्र्याचे नाव घेत आले. या वेळी त्यांनी डाॅक्टर नाहीत, नंतर या अशा म्हणाल्या. दरम्यान, पाणी द्या अशी विनंती केली. त्या उठत असताना त्यातील एका चोरट्याने साडेचार तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पलायन केले. दोघेही स्पोर्ट्स बाईकवरून चौगुले नगरकडे पलायन केले. या वेळी त्यांनी आरडाओरड केली असता, काही नागरिक त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद वडगाव पोलिसांत नोंद करण्यात आली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. तसेच तपासाबाबत सूचना दिल्या.