समाजाच्या जागेवर धारवट झोपडपट्टीचे पुनर्वसन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:12+5:302021-06-01T04:19:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : स्टेशन रोडवरील धारवट झोपडपट्टीवरील जागा हटकर कोष्टी समाजाच्या मालकीची असून, पालिकेने या जागेवर झोपडपट्टीचे ...

Dharvat slums should not be rehabilitated in the community space | समाजाच्या जागेवर धारवट झोपडपट्टीचे पुनर्वसन करू नये

समाजाच्या जागेवर धारवट झोपडपट्टीचे पुनर्वसन करू नये

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : स्टेशन रोडवरील धारवट झोपडपट्टीवरील जागा हटकर कोष्टी समाजाच्या मालकीची असून, पालिकेने या जागेवर झोपडपट्टीचे पुनर्वसन करू नये, अशा मागणीचे निवेदन हटकर कोष्टी समाजाच्या वतीने नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.

निवेदनात, हटकर कोष्टी समाजाच्या जागेवर काही वर्षांपासून झोपडपट्टी वसली असून, पालिका दप्तरी धारवट झोपडपट्टी अशी नोंद आहे. या जागेबाबत एसआरए (बांद्रा, मुंबई) या न्यायालयात दावा सुरू असून, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने येथे सदनिका बांधणी करता येणार नाही. समाजाच्या जागेवर असलेल्या धारवट झोपडपट्टीमधील नागरिकांना इतरत्र पालिका मालकीच्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात राजू कोन्नूर, अमित कबाडे, चिंतामणी पारीशवाड, प्रशांत गलगले, राहुल तेलसिंगे, आदींचा समावेश होता. दरम्यान, समाजाच्या जागेबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Dharvat slums should not be rehabilitated in the community space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.