शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी धरणे

By संदीप आडनाईक | Updated: December 2, 2023 17:16 IST

आमदार प्रकाश आवाडे, जयंत आसगांवकर यांची मराठा आंदोलनाला भेट

कोल्हापूर : दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सुरु केलेल्या साखळी धरणे आंदोलनात शनिवारी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार जयंत आसगावकर यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. याशिवाय विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही शनिवारी भेट दिली.दसरा चौकातील मांडवात सकाळी ११ ते १२ या वेळेत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलेे. या आंदोलनादरम्यान समन्वयक वसंत मुळीक, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, सुनीता पाटील आदींनी तासभर धरणे धरले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आमदार प्रकाश आवाडे, इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, ताराराणी आघाडीचे प्रकाश दत्तवाडे यांनी आंदोलकांची भेट घेतली.वसंतराव मुळीक म्हणाले, जालना येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या शुक्रवारच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यातून सरकारने धडा घ्यावा. दरम्यान, प्रकाश आवाडे यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक लेखी पत्र मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीच दिले आहे. विधानसभेत यावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. वसंतराव मुळीक आणि बाबा इंदूलकर यांनी त्यांचे स्वागत केले.विविध संस्था, पदाधिकाऱ्यांनी दिली भेटशनिवारी दसरा चौकातील साखळी धरणे आंदोलनाला विविध संस्था आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यामध्ये शेतकरी संघाचे अजित मोहिते, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचा समावेश आहे.धरणे आंदोलनात शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, संभाजीराव जगदाळे, उदय लाड, सुनील मोरे, गोपाळ पाटील, फिरोज खान, सुधा सरनाईक, रेश्मा पवार, महादेव जाधव, उत्तम वरुटे, चंद्रकांत चव्हाण, संपतराव पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन