धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:25+5:302021-04-13T04:22:25+5:30

महाडिक हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोकुळ मोडण्यासाठीच विरोधक एकत्र आल्याचा आरोप केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास ...

Dhananjay Mahadik should not remove my key | धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये

धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये

महाडिक हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोकुळ मोडण्यासाठीच विरोधक एकत्र आल्याचा आरोप केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी आतापर्यंत कोणाच्याही विरोधात बोललो नाही. पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करतानाही मी १५, २० लाख रुपये घेवून नोकऱ्यांचा बाजार याविषयी संताप व्यक्त केला होता. गोकुळ दूध उत्पादकांच्या मालकीचा करू, वासाच्या आणि कमी प्रतीच्या दुधाचा मोबदला देऊ आणि शेतकऱ्यांना दोन, चार रुपये जादा दर देऊ अशी आमची भूमिका आम्ही मांडली. माझ्या जिल्हा बँकेसह साखर कारखाना, अन्य संस्था चांगल्या चालल्या आहेत. त्यामुळे महाडिक यांनी माझ्यावर टीका करू नये. मुंबई, पुण्यातील दूध विक्री, भीमा कारखान्याचं मी बाहेर काढलं तर मग वाईट होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Dhananjay Mahadik should not remove my key

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.