शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
3
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
4
"गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
5
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
6
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
7
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
8
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?
9
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना
10
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
11
अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड
12
"दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज’’,हर्षवर्धन सपकाळ .
13
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
14
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
15
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
16
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
18
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
19
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
20
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?

धनंजय महाडिक यांचा उद्या भाजप प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:24 IST

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक उद्या, रविवारी (ता. १ ) सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ...

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक उद्या, रविवारी (ता. १ ) सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: महाडिक यांनीच ही माहिती दिली.सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाडिक भाजप प्रवेश करतील. गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामध्येही महाडिक निवडून आले होते. तीन महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. शुक्रवारी रात्री प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांनी त्यांना फोन करून उद्या अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले. महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नंतर कोल्हापुरात पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.राज्य उपाध्यक्षपदी वर्णीमहाडिक यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशी चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, महाडिक यांनी दिल्लीत खासदारकीच्या काळामध्ये कामाचा ठसा उमटविल्याने एखाद्या केंद्रीय समितीमध्ये त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.