धनंजय महाडिक यांचा उद्या भाजप प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:24 IST2019-08-31T00:23:48+5:302019-08-31T00:24:02+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक उद्या, रविवारी (ता. १ ) सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ...

Dhananjay Mahadik to enter BJP tomorrow | धनंजय महाडिक यांचा उद्या भाजप प्रवेश

धनंजय महाडिक यांचा उद्या भाजप प्रवेश

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक उद्या, रविवारी (ता. १ ) सोलापूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: महाडिक यांनीच ही माहिती दिली.
सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाडिक भाजप प्रवेश करतील. गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामध्येही महाडिक निवडून आले होते. तीन महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. शुक्रवारी रात्री प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांनी त्यांना फोन करून उद्या अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले. महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नंतर कोल्हापुरात पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

राज्य उपाध्यक्षपदी वर्णी
महाडिक यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशी चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, महाडिक यांनी दिल्लीत खासदारकीच्या काळामध्ये कामाचा ठसा उमटविल्याने एखाद्या केंद्रीय समितीमध्ये त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Dhananjay Mahadik to enter BJP tomorrow