Dhanaji, Desai visited PN | धनाजी, देसाई यांनी घेतली पी.एन.यांची भेट

धनाजी, देसाई यांनी घेतली पी.एन.यांची भेट

गोकुळचे माजी संचालक व बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई यांनी आमदार पी. एन. पाटील यांची आज भोगावती कारखान्यावर भेट घेऊन चर्चा केली. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरली आहे. धनाजी देसाई हे माजी आ. के. पी. पाटील यांचे खंदे समर्थक आहेत.

गोकुळच्या निवडणुकीसाठी ते भुदरगडमधून इच्छुक आहेत. राधानगरीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे खंदे समर्थक राजू भाटळे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत थेट सतारूढ गटातून महादेवराव महाडिक यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला? यावरूनही संभ्रम आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन चौगले, गोकुळचे माजी संचालक फिरोजखान पाटील हे इच्छुक आहेत; परंतु ही दोन नावे चर्चेत असताना खुद्द ए. वाय. पाटील यांनी स्वत: व पत्नी अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीतमध्ये प्रा. किसन चौगले यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.

देसाई १९९७ ते २००२ पर्यंत गोकुळचे भुदरगडमधून संचालक म्हणून काम करत होते. देसाई यांनी सतारूढ गटातून उमेदवारीची मागणी केली आहे. बिद्री कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत. त्यांनी आज सतारूढ गटाचे नेते आ. पी. एन. पाटील यांची भोगावती कारखान्यावर भेट घेऊन राजकीय चर्चा केली. त्यामुळे आता देसाई यांचीही सतारूढ गटातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे.

फोटो ओळी :

भोगावती (ता.करवीर) येथील एका कार्यक्रमात धनाजी देसाई यांचा पी. एन. पाटील यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष जालंदर पाटील व मान्यवर.

Web Title: Dhanaji, Desai visited PN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.