शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

धामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:34 IST

water shortage Grampanchyat Kolhapur- धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.

ठळक मुद्देधामोडवाशीयानो सावधान ! फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा होणार बंद थकबाकी वसुलीसाठी उचलले पाऊल

श्रीकांत ऱ्हायकरधामोड (ता. राधानगरी) :  येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मंडळाने हे वीज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा लावल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामस्थांनी दोन दिवसात थकित रक्कम न भरल्यास नाईलाजास्तव एक फेब्रुवारी पासून गावच्या पाणीपुरवठा बंद होणार आहे.धामोड येथील ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये नऊनंबर, लाडवाडी, कुरणेवाडी, जाधववाडी व तुळशी धरण वसाहत या गावांचा समावेश होतो. या सर्व गावांसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. सध्या या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे.

पण गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतीच्या मिळकत उत्पन्नातील घरफाळा व पाणीपट्टीचे जवळपास सोळा लाख रुपये थकल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यातच थकीत वीज बिल भरण्यासाठी वीज महामंडळाने तगादा लावला आहे. पण ग्रामपंचायतीकडे हे वीज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यास या सर्वच गावचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. याची पूर्व कल्पना म्हणून गावातून वारंवार दौंडी देऊन लोकांना पाणीपट्टी व घरफाळा भरण्याचे आवाहन केले आहे. पण लोकांनी या आवाहनाला दाद न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कालच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गावकऱ्यांकडून घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य न मिळाल्यास एक फेब्रुवारीपासून गावचा पाणीपुरवठा नाईलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण डिमांड व वसुली यांचा विचार केला असता लाईट बिल व इतर खर्चाचा ताळमेळ घालणे अशक्य असल्याची बाब सर्व सदस्यांना सांगीतली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय बैठकअंती घेतला आहे .-एल. एस. इंगळेग्रामसेवक, धामोड.

थकित घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन धामोड वाशीयांना वारंवार करून देखील ते भरण्याची तसदी त्यांनी न घेतल्याने नाईलाजास्तव ही कठोर पावले उचलावी लागणार आहेत .- अशोक सुतारसरपंच, ग्रामपंचायत, धामोड

टॅग्स :water shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर