‘हॉकी मैदाना’जवळ ‘धमाल गल्ली’

By Admin | Updated: June 1, 2015 00:31 IST2015-06-01T00:30:28+5:302015-06-01T00:31:29+5:30

सर्व एकाच ठिकाणी : स्केटिंग, रस्सीखेच, सॅकरस, स्पॉट परफॉर्मन्स; ‘लोकमत धमाल गल्ली’ची गंमत

'Dhamal Galli' near 'hockey ground' | ‘हॉकी मैदाना’जवळ ‘धमाल गल्ली’

‘हॉकी मैदाना’जवळ ‘धमाल गल्ली’

कोल्हापूर : शाळा, अभ्यास, नोकरी, व्यवसाय, घरकाम अशा रोजच्या दगदगीतून आबालवृद्धांना मनात येईल तशी मजा करण्यासाठी व काही हसऱ्या क्षणांचा आनंद घेण्याकरिता ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ आयोजित केलेल्या ‘लोकमत धमाल गल्ली’त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी आनंद लुटला. रंकाळा, महावीर गार्डन, साईक्स एक्स्टेन्शननंतर आता ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ रविवारी सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या ‘लोकमत धमाल गल्ली’त उत्स्फूर्त जल्लोषाचा अनुभव साऱ्यांनीच अनुभवला. गेले सहा रविवार अनेकजण अंतर्मनाला हाक देत आपल्या बालपणीच्या विश्वात रमून गेले होते. या रविवारी स्पॉट म्युझिकल परफॉर्मन्स, नृत्य, स्केटिंग, स्केचिंग व ड्रॉइंग, मर्दानी खेळ, झिम्मा-फुगडी, पारंपरिक खेळ, दोरीउड्या, रस्सीखेच, वन मिनिट गेम शो, पोत्यात पाय बांधून धावण्याची शर्यत, मामाचे पत्र हरविले, आंधळी कोशिंबीर असे मराठमोळे खेळ... तसेच आनंदनिर्मिर्ती करणारे कल्पनेपलीकडील प्रकार आपल्या उत्साही आबालवृद्धांनी सादर केले. ‘धमाल गल्ली’चे खास वैशिष्ट्य असे की, बालकापासून ते ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील पुरुष, महिला, मुले आणि मुलींनी मनसोक्त आनंद लुटला.ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे रविवारी सकाळी सात वाजता ‘धमाल गल्ली’च्या सुरुवातीस सचिन टीम टॉपर रोलरच्या स्केटिंग अकॅडमीच्या ३० मुला-मुलांनी रोलर स्केटिंगमधील विविध प्रात्यक्षिके सादर केली. रस्सीखेच खेळाने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या ताकदीचा कस पाहण्याचा आनंद उपस्थितांना घेता आला. खेळ पाहताना प्रेक्षकांची हसून-हसून पुरेवाट झाली.
पोत्यात पाय घालून पळण्याच्या सॅकरस प्रकारात तर अनेक लहान मुलांनी सहभाग घेत या नवख्या प्रकारच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला. शिवाय पोट धरून हसायलासुद्धा लावले. स्पॉट परफॉर्मन्स अंतर्गत साक्षी कुलकर्णी हिने काईक्स चित्रपटातील ‘चिटीया कलिया बे’ या गाण्यावर नृत्य सादर केले; तर शर्वरी कुलकर्णी हिच्या ‘गणनायका गणाधीशा’ हे गाण्यावर सारे डोलायला लागले. ७५ वर्षांचे महादेव चौगुले यांनी अभिनेता राजकपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटातील ‘आवारा हूॅँ’ हे गाणे म्हणून धमाल उडविली. दोन वर्षांच्या श्रेष्ठा बुरगे हिने ‘फुलराणी’ ही कविता सादर केली. दूरचित्रवाणीवरील ‘खंडेराया’ या मालिकेतील ‘जयदेव जयदेव मार्तंडा’ या गीतावरील नृत्य कुबेर शेडगे, श्रुती शेडगे, प्रेरणा शेडगे, देविका शेडगे यांनी हुबेहूब वेशभूषा परिधान करून सादर केले. याला ‘वन्स मोअर’ मिळाला. अंकिता पेडणेकर हिने नृत्य, तर श्रेया भोई हिने ‘मनवा लागे’ हे गाणे गाऊन वाहवा तर मिळवली. ‘यूथ फॉर हेल्प गु्रप’च्या प्रसाद कारेकरने प्रसिद्ध गायक अरजितचे गाणे गायिली.


शिवकालीन प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना स्तब्ध केले
हिंद प्रतिष्ठानच्या अवधूत घाडगे, विशाल भाले, मंथन मेस्त्री, गणेश वरपे, आशिष कोकाटे, साई पाटील, अशू काशीद, हृषिकेश सुतार, हरी सुतार, कुणाल सांगवडेकर, संतोष कुदळे, गौरू पाटील, अभिजित शेडगे, ओमकार शेडगे यांनी लाठीकाठी, दांडपट्टा या शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. मुग्धा यादव, साक्षी यादव, साई पाटील यांनी दांडपट्टा, लाठीकाठी यांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.



‘धमाल गल्ली’च्या पहिल्या पर्वापासून अक्षय डोंगरे, विक्रम रेपे यांनी उत्कृष्ट निवेदनाबरोबर अभिनयकौशल्यही सादर केले; तर ‘यूथ फॉर हेल्प’च्या स्वप्निल गोतेकर, प्रणिल मिसाळ, तुषार शिंदे, आकाश गवळी, आकाश घुगरदर, संग्राम कांबळे, ओंकार घुगरदरे, प्रवीण पाटील, वैभव बिदनूर, ओंकार पाटील, अभिनव नलवडे, अभिजित चव्हाण, सनी बोटे, सिद्धेश जगताप, गणेश आडनाईक, सत्यम कदम, अक्षय सावंत, शैलेश पाटील, अजित कदम, प्रसाद तावदरे, नीलेश काळुगडे, रत्नदीप देशमुख, प्रसाद टोळ, विनय साने, जयकुमार सोनुलेकर, नीलेश पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

मयूरेशच्या स्केटिंग परफॉर्मन्सवर सर्वांची नजर
जन्मत:च् मूकबधिर असणाऱ्या मयूरेश माजगावकर याने सचिन टीम टॉपर अकॅडमीकडून
सर्वांच्या बरोबरीने स्केटिंगची प्रात्यक्षिके सादर करीत आपणही कमी नसल्याचे दाखविले. त्याच्या परफॉर्मन्सला विशेष दाद दिली. नजर

Web Title: 'Dhamal Galli' near 'hockey ground'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.