शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत धैर्यशील मानेंनी नाचवली सासनकाठी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:54 IST

गुलाल, खोबऱ्यांची उधळण, सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात तल्लीन

दुर्वा दळवी

कोल्हापूर: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज, मंगळवारी चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. गुलाल, खोबऱ्यांची उधळण, सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात तल्लीन झाले आहेत.दरम्यानच, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनीही प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढत श्री जोतिबाचे दर्शन घेतले. तसेच खांद्यावर घेवून सासनकाठीही नाचवली. तर जनतेच्या सुखासाठी जोतिबा चरणी प्रार्थना केली.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना धैर्यशील माने म्हणाले, हा परमेश्वराचा गुलाल आहे. माझ्या हातातून चांगली कामे घडत राहावीत, लोकांची सेवा घडत राहावी अशी प्रार्थना केली. तसेच माझ्या वाढदिवसादिवशी जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो त्यावेळी मोदींना दख्खनचा राजा श्री जोतिबाची मुर्ती भेट दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझे भक्ती अन् श्रद्धास्थान असल्याने मी जोतिबा चरणी आल्याचे सांगत देवाकडे काय मागावे तो सर्वांच्या मनातील जानतो त्यामुळे केवळ जोतिबा चरणी नतमस्तक व्हावे या भावनेने आपण आल्याचे ते म्हणाले. राजकारण हे देवळाच्या बाहेर. देवाच्या चरणी सर्वजण सारखे असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.नरेंद्र मोदी हे निश्चितच पुन्हा एकदा पंतप्रधान आहेत याबाबत मनामध्ये तिळमात्र शंका नसल्याचा विश्वासही माने यांनी व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.यात्रेनिमित्त गेल्या चार दिवसांपासूनच मानाच्या सासनकाठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या. चांगभलंच्या गजराने डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. भाविक बैलगाडी, खाजगी वाहनातून, तसेच पायीदेखील जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरJyotiba Templeजोतिबाdhairyasheel maneधैर्यशील माने