ढगांचा ढोल अन् विजांचे तांडव!

By Admin | Updated: June 8, 2014 01:18 IST2014-06-08T01:17:16+5:302014-06-08T01:18:44+5:30

मध्यरात्री कोल्हापूरकरांचा थरकाप : जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

Dhagal Dhol and the wand of the wand! | ढगांचा ढोल अन् विजांचे तांडव!

ढगांचा ढोल अन् विजांचे तांडव!

कोल्हापूर : कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट व थरकाप उडविणाऱ्या विजेच्या कडकडाटाने आज, शनिवारी पहाटे साखरझोपेत असलेल्यांची झोप उडवली. ढगांचे ढोल वादन, विजांचे सुरू असलेले तांडवनृत्य त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा यांच्या साक्षीने वरुणराजाने कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. चक्क सुर्यप्रकाशासारखा विजेचा लखलखाट तब्बल पाऊण तास सुरू राहिला. खवळलेल्या समुद्रात प्रचंड लाटा उसळाव्यात तसा आभाळात ढगांचा गडगडाट होत होता. या स्थितीत मुलाबाळांना पोटाशी धरून अनेक जण भीतीने अक्षरश: गोठून गेले.
वादळी वारे व ढगांचा गडगडाट हा वादळी पावसावेळी कायमच होतो, परंतु कालची तऱ्हा न्यारीच होती. अशा प्रकारच्या विजा कडाडणे व ढगांचा गडगडाट मागच्या पाचपंचवीस वर्षांत अनुभवला नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. येत्या पावसाळ््यात काही विपरीत तर घडणार नाही ना, अशी भीतीही त्यातून व्यक्त झाली.
शुक्रवारी दिवसभर व रात्रीही वातावरणात कमालीचा उष्मा होता. मध्यरात्री अडीचनंतर एकदम विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुरू झाला. वाऱ्यामुळे झाडे जमिनीवर लोळण घेत होती. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज बंद झाली. घरात अंधार आणि बाहेर आकाशात विजांचे तांडवनृत्य पाहून सर्वांचीच झोप उडाली. वारे इतके जोरदार होते की, घरांच्या खिडक्या उघडण्याचे धाडसही होत नव्हते. विजेचे असे रौद्ररूप पहिल्यांदाच अनुभवण्यास मिळाल्याने लोकांचा भीतीने थरकाप उडाला. ढगांचा कानठळ्या बसवणारा आवाज होत होता. जमिनीला घासून विजेचा खेळ सुरू असल्याने घराबाहेर पडण्याचे धाडसही होत नव्हते. विजेचा लखलखाट डोळे दीपवणारा होता. नेहमी होणाऱ्या विजेचा वेग कमालीचा असतो; पण ही वीज संथगतीने जात असल्याने कोणत्याही क्षणी आपल्या घरावर कोसळेल, अशी भीती वाटत होती. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. आडव्या-तिडव्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पाऊस सुरू झाला तरी विजांचा कडकडाट सुरूच होता. वीज झाली की घराच्या खिडक्यांच्या काचा, घरातील भांड्यांचा आवाज व्हायचा. जणू धरणीकंप झाल्यासारखे (पान ७ वर)

Web Title: Dhagal Dhol and the wand of the wand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.