शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; शेड उभारण्याची मागणी

By संदीप आडनाईक | Updated: July 6, 2024 21:21 IST

भरपावसातही शनिवारी असंख्य भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

कोल्हापूर: भरपावसातही शनिवारी असंख्य भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवार आणि रविवारची सुटीला जोडून कोल्हापुरात पर्यटनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी शनिवारी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. ही रांग मंदिराबाहेरपर्यंत लांबली होती. भाविकांसाठी उभारलेल्या दर्शनरांगेत शेडची व्यवस्था नसल्यामुळे अनेक महिला, ज्येष्ठ नागरिकांसह भाविकांना सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे सुमारे तासभर भिजत रांगेतच थांबावे लागले.

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. शनिवारीही हजारो भाविकांनी अंबाबाई मंदिरात हजेरी लावली. सायंकाळी तासभर पडलेल्या पावसामुळे रांगेत उभारलेल्या अनेक भाविकांना याचा फटका बसला. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली. टोप्या, छत्री, साडीचे पदर डोक्यावर घेत महिलांना तसेच इतर भाविकांना भरपावसात दर्शन रांगेत थांबावे लागले. त्यामुळे दर्शनरांगेत शेड उभारण्याची गरज भाविकांनी बोलून दाखविली. या शेडमुळे भाविकांचे ऊन, वारा तसेच पावसापासून बचाव होणार आहे. अंबाबाईच्या भाविकांसाठी देवस्थान समितीने प्रथमोपचार केंद्र, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच दर्शनरांगेत एलसीडीद्वारे अंबाबाईचे लाइव्ह दर्शनाची सुविधा पुरवलेली आहे. सोबत पोलिस बंदोबस्तही आहे.

वॉटरप्रूफ दर्शनरांगेची मागणीपावसापासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी दर्शनरांगेत शेड नाही. पाऊस आलाच तर भाविकांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी शेडची व्यवस्था करण्याचीही मागणी भाविकांनी केली आहे. पावसातही देवीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शनरांग वॉटरप्रूफ करावी, अशी भाविकांची आग्रही मागणी आहे. यामुळे भाविकांना २४ तास दर्शनरांगेत थांबता येणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यापासून रामपारावरील लोखंडी शिडीपर्यंतच्या दर्शनरांगेच्या मार्गावर हे शेड उभारल्यास त्याचा फायदा भाविकांना होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर