शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जोतिबा डोंगरावरील पुजारी-भाविक मारहाण प्रकरण तापलं, निषेधार्थ भाविकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:50 IST

देखाव्यातून मांडली पुजाऱ्यांची वागणूक

कोल्हापूर : पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ परितेसह (ता.करवीर) भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी जोतिबा देवस्थानच्या पुजाऱ्यांविरोधात कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. हलगी वादनावरुन पुजारी व परिते ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादातून पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केली. शिवाय भाविकांनी मद्यप्राशन केल्याची बदनामी केल्याचा आरोप करत परितेसह भोगावती खोऱ्यातील कुरुकली, हळदी, घोटवडे, राशिवडे, ठिकपुर्ली, कोथळी, कांडगाव, देवाळे, कौलव, सिरसेसह पंचक्रोशीतल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी ११ वाजल्यापासून भोगावती खोऱ्यातील नागरिक दसरा चौकात येण्यास सुरुवात झाली. शहाजी कॉलेजच्या मैदानावर नागरिक जमा होत होते. तेथून १२ :३० च्या दरम्यान नागरिक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. नाही चालणार, नाही चालणार दादागिरी नाही चालणार, जोतिबा मंदिरातील दोषी पुजाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, भाविकांना न्याय मिळायलाच हवा, पूजारी हटाव जोतिबा बचाव यासह अनेक फलक घेऊन मोर्चेकरी दसरा चौक, व्हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. येथे मोर्चेकरांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.देखाव्यातून मांडली पुजाऱ्यांची वागणूकया मोर्चात जोतिबावरील पूजारी भाविकांना कशा प्रकारे वागणूक देतात याचा एक सजीव देखावा तयार करण्यात आला होता. एका ट्रॅक्टर ट्रॉलीत केदार पाटील या सहावीतील मुलाला जोतिबा बनवण्यात आले होते. तर पुढे पाच-सहा पुजारी एका भाविकाच्या डोक्यावर नारळ फोडत आहेत असा देखावा केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Jyotiba Temple Priests' Assault Sparks Protests, Devotees March

Web Summary : Villagers protested against Jyotiba temple priests in Kolhapur for allegedly assaulting devotees. Thousands marched to the Collector's office, demanding justice and the priests' removal. A tableau depicted the priests' alleged mistreatment of devotees.