शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांसाठी खुशखबर! तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अंबाबाईचे जवळून दर्शन घेता येणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 28, 2023 13:42 IST

कोरोना काळात पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची सोय बंद करण्यात आली होती

कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर उद्या, मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई भक्तांना देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी ही घोषणा केली. गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे.कोरोनाने २०२० साली थैमान सुरू केले त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगअंतर्गत अंबाबाई मंदिरातील भाविकांसाठीही काही अटी व नियम घालण्यात आले. त्यानुसार भाविकांसाठी पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची सोय बंद करून शंखतीर्थ चौकातून मुख दर्शन सुरू झाले. कोरोना संपल्यानंतरही आतून दर्शन सुरू झाले नाही. दुसरीकडे देवस्थान समिती व श्रीपूजकांकडून आलेल्या विशिष्ट भाविकांना आत नेऊन दर्शन घडवण्यात येत असल्याने वारंवार वादाचे प्रसंग घडत होते. देवीच्याच दारात आमच्यावर अन्याय होतोय अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत आतून दर्शन सुरू करण्याची मागणी हाेत होती. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सकाळी मंदिरातील विकासकामांच्या उदघाटनानंतर ही घोषणा केली. काेरोना काळात पितळी उंबऱ्याच्याआतून बंद केलेले अंबाबाई दर्शन आज मंगळवारपासून सुरू होत आहे. गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे अधिक जवळून दर्शन घेता येईल ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर